गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे अध्यक्ष रामदास महाराज यांचे निधन

by India Darpan
सप्टेंबर 25, 2020 | 12:05 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200925 WA0039 e1601035489211

मनमाड – राष्ट्र संत कैकाडी बाबांचे पुतणे हभप रामदास महाराज जाधव यांचे अकलूज मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले , ते ७२ वर्षांचे होते. त्यांचे मुळ गाव मनमाड होते. त्यांच्या निधनाने एक गाडगे महाराजांचे विचाराचे अनुयायी आणि परखड प्रबोधनकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. पंढरपूर मध्ये विठ्ठल मंदिरानंतर सर्वात लोकप्रिय म्हणून कैकाडी मठाचा उल्लेख केला जातो. अतिशय कमी जागेत कैकाडी मठात हजारो विविध काळातील प्रसंग मूर्त्यांची रूपाने उभारण्यात आला आहेत . स्थापत्य कलेचा अतिशय उत्कृष्ठ नमुना म्हणून कैकाडी महाराजांचा मठ याची ओळख आहे. वारकरी संप्रदायामध्ये कैकाडी बाबांचे स्थान मोठे होते आणि  तोच कैकाडी बाबांचा आध्यत्मिक वारसा हभप रामदास महाराज चालवत होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली म्हणून उपचारासाठी अकलूज येथे दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना रामदास महाराज यांची आज दुपारी ३.४० च्या सुमारास प्राणज्योत मालवली. रामदास महाराजांच्या निधनाचे वृत्ताने त्यांच्या हजारो अनुयायांमध्ये शोककळा पसरली आहे.

संत कैकाडी बाबा, हभप कोंडीराम काकांचे अध्यात्मिक कार्य रामदास जाधव महाराज यांनी अतिशय नेटाने पुढे चालवले होते. संत गाडगे बाबांच्या विचारांचा प्रचार, बहुजन समाजातील युवकांना जागृत करण्याचे मोठे काम रामदास महाराज यांनी सुरू केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू ला पंढरीतून विठ्ठलाचा पालखी सोहळा, संत नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मनमाडहून पालखी सोहळा त्यांनी सुरू केला होता. येथील विश्व पुण्यधाम मधून जगाला अध्यात्म आणि विज्ञान यांचे दर्शन देणारी अभिनव सृष्टी त्यांनी उभारून संत कैकाडी बाबा, कोंडीराम काकांचे स्वप्न पूर्ण केले होते. समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, प्रथा – परंपरा यावर रामदास महाराज कठोर शब्दात प्रहार करीत असत. त्यामुळे बहुजन समाजातील युवक वर्गात त्यांची विशेष क्रेझ आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रेमडिसिव्हरचा साठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करुन द्यावा – भुजबळ

Next Post

कोरोनासाठी ‘स्मार्ट प्लॅनची’ गरज; मनसैनिकांनी घेतली भुजबळांची भेट

India Darpan

Next Post
abc

कोरोनासाठी 'स्मार्ट प्लॅनची' गरज; मनसैनिकांनी घेतली भुजबळांची भेट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011