पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (वय ६०) यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर ते बरे झाले. पुन्हा त्यांना त्रास सुरू झाल्याने तातडीने येथील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कोरोनामुळे राज्यात आणखी एका नेत्याचा प्राण गेला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातून तीव्र चिंता व्यक्त होत आहे.