नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, पंचवटी येथील बीफार्म शेवटच्या वर्षातील ११ विद्यार्थ्यांनी नायपर-जेईई २०२० या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या मध्ये नक्षत्रा चौधरी, मृदुल देशपांडे, श्रुती कुलकर्णी, प्रतीक कटारे, संचिता डे, रुपाली कानडे, श्रिया वाघ, सोहम लोहारकर, प्रतीक केदार, स्वाती गोरे, अश्विनी अहिरे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
नायपर म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च होय. ही स्पर्धा परीक्षा भारत सरकारच्या फार्मासुटिकल्स या विभागातर्फे मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टीलायझर्स, अहमदाबाद येथून आयोजित केली जाते. २००७ पासून बायोटेकनॉलॉजि, नॅचरल प्रॉडक्ट्स, फार्मासुटिक्स, फार्मसुटीकल ऑनालिसिस , मेडिसिनल केमेस्ट्री, फार्माकोलॉजि, टॉक्सिकोलॉजि या विषयांमध्ये विशेषज्ञता घेतली जाते.
औषधनिर्माणशास्त्रातील शिक्षण आणि संशोधन यासाठी ही परीक्षा उपयोगी पडणारी आहे. यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची निवड ही भारतातील उत्तमोत्तम महाविद्यालयामध्ये होते. यानंतर विद्यार्थ्यांना एमफार्म ही पदवी प्राप्त होते. GPAT उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच फक्त ही परीक्षा देता येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना GPAT व नायपर यांच्या संयुक्तीत उत्तीर्ण विद्यार्थाला एमफार्म करतांना शिष्यवृत्ती मिळते. तसेच चांगले मार्क्स असतील तर चांगल्या कंपनी मध्ये उच्च पदावर सहज निवड होते.
१००% योग्य ठिकाणी निवड होते. या परीक्षेची संपूर्ण भारतात ७ ठिकाणी केंद्रे आहेत. मोहाली, हैद्राबाद, अहमदाबाद, कलकत्ता, गुहाहाटी, हाजीपूर-पटना, रायबरेली या ठिकाणांहून परीक्षा देता येते. याप्रसंगी संस्थेचे सरचिटणीस मा. डॉ. प्रशांत हिरे, संस्थेचे समनव्ययक मा. डॉ. अपूर्व हिरे, संस्थेचे सहसचिव मा. डॉ. व्ही.एस.मोरे, महाविद्यालयाच्या सीडीसी कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. राजेश शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.. राजेंद्र भांबर, उपप्राचार्य मा. डॉ. सुनील महाजन, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.