मुंबई – मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली आहे. कसारा ते खर्डी दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. काही प्रवाश्यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी तातडीने रेल्वे थांबविण्यासाठी हालचाली केल्यानंतर त्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला आहे. या दुर्घटनेत सर्व प्रवासी सुखरुप असून कुणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला असून एक्सप्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना झाली आहे.