नाशिक – रस्त्याच्या दुतर्फा विविध वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामादरम्यान ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे गणेशवाडीच्या हरिकृष्ण सोसायटीतील शुभम सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी समिती गठीत करून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत तपास करून दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व सूर्यवंशी कुटुंबातील सदस्याला नोकरी व २५ लाख रुपयांची आर्थिक देण्यात यावी, अशी मागणी पंचवटी युवक विकास समितीच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन समितीने भुजबळ यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पंचवटी परिसरात स्मार्ट सिटीचे अमरधाम ते जुना आडगाव नाका, येथे रस्त्याच्या दुतर्फा विविध वाहिन्या भूमिगत करण्याचे काम सुरु आहे.या परिसरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.शिवाय अमरधाम रोडचा परिसर असल्यामुळे शावाहिनी व फुलबाजार,भाजीबाजार यामुळे या मार्गावर कायम वर्दळ असल्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.स्थानिक रहिवासी ठेकेदाराला निर्माण होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करतात पण उडवा उडवीचे उत्तरे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गणेशवाडी परिसरातील हरिकृष्ण सोसायटी मधील कै.शुभम सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला आहे.त्याच्या मृत्यूला सबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा संशय निर्माण होतो.
त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी समिती गठीत करून गुन्हे अन्वेषण विभागाच्या मार्फत तपास करून दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.शिवाय सूर्यवंशी कुटुंबाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले असले तरी शासनाच्या मार्फत कुटुंबातील सदस्याला नोकरी व २५ लाख रुपयांची आर्थिक देण्यात यावी.शिवाय परिसरात अद्यापही कामकाज सुरु असल्याने वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा व भविष्यात अश्या प्रकारच्या घटना घडू नये या साठी स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्या समन्वयासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी पंचवटी युवक समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.त्यावेळी पंचवटी युवक विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत,कार्याध्यक्ष किरण पानकर,सरचिटणीस सचिन दप्तरे,चिटणीस संतोष जगताप ,संघटक वैजनाथ कड यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.