नवी दिल्ली – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं वाहनांशी संबंधित परवान्यांच्या वैधतेची मुदत ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवली आहे.
कोविड-१९ चा फैलाव रोखण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतला असून याबाबतच्या मार्गदर्शक सूचना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत.
ज्या वाहनांच्या परवान्यांची मुदत १ फेब्रुवारी २०२० पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत संपत आहे त्यांना देखील हा निर्णय लागू राहणार आहे.