नाशिक – गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या पावसामुळे नाशिककरांची चिंता मिटली आहे. जायकवाडी धरण ९० टक्के भरल्याने यंदा मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याची आवश्यकता राहणार नाही. सध्या जायकवाडीमध्ये १८ हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील नद्यांचे पाणी जायकवाडीमध्ये जात आहे. सद्यस्थितीत जायकवाडीचा साठा ९० टक्के झाला आहे. २६९१ दशलक्ष घन मीटर पाणी धरणात असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.