नवी दिल्ली – भौतिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण संशोधन करणाऱ्या रॉजर पेनरोस, रिनहार्ड जेन्झेल आणि अँड्रिया घेज या तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. नोबेल समितीने दुसऱ्या दिवशी भौतिकशास्त्रातील नोबेलल जाहीर केले.
रॉजर पेनरोझ यांनी ब्लॅक होल फॉर्मेशनद्वारे जनरल थियरी ऑफ रिलेटिव्हिटीचा अंदाज लावला जाऊ शकतो, असे संशोधन केले आहे. तर रेनहार्ट आणि अँड्रिया यांनी आकाशगंगेच्या मध्यभागी सुपरमॅसिव्ह कॉम्पॅक्ट ऑब्जेक्टचा शोध लावला आहे. ब्लॅकहोलच्या या संशोधनामुळे विश्वातील मोठे रहस्य उलगडल्याचे समितीने म्हटले आहे.