नाशिक – शहरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी रोजगार मेळावा नोंदणी सुरू करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार देवयानी फरांदे आणि डॉ. प्रशांत पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने ही नोंदणी करण्यात येत आहे.
देशावर तसेच राज्यावर ओढवलेल्या कोरोना संकटामूळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्या अनुषंगाने इच्छुकांना नौकरी उपलब्ध करून देण्यासाठी फरांदे आणि पाटील यांनी प्रयत्न सुरू केले आहेत परप्रांतीय कर्मचारी त्यांच्या मूळगावी गेले असल्याने स्थानिक विविध आस्थापनानंमध्ये रिक्त पदे निर्माण झाली आहेत. लवकरच रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. म्हणून इच्छुकांनी खालील लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे.
अर्जाची लिंक – http://shorturl.at/ikxOT