नाशिक – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट मधूनच कबुली दिली आहे. त्यामुळे नैतुकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस) त्याचा विचार करायला हवा, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत शहरात ३ कार्यक्रम झाले. फडणवीस यांच्या हस्ते अथश्री प्रकाशनच्या नाना नवल यांच्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले. फडणवीस यांनी मुंडे प्रकरणाचा चांगलाच समाचार घेतला. धनंजय मुंडे यांनी स्वतः फेसबुक पोस्टवर कबुली दिलीय. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षानं (राष्ट्रवादीने) याचा विचार केला पाहिजे. पोलिस तपासात पूर्ण सत्य समोर आल्यानंतर त्यावर टोकाची भूमिका घेऊ, असे फडणवीस यांनी म्हटले.