नैताळे – नाशिक जिल्हयातील नैताळे येथिल युवा शेतक-याने पाठीवरील पंपासाठी वेगळाच जुगाड केला व तो अनेकांच्या पसंतीला सुध्दा उतरला. शेती पिकांवर अौषध फवारणी साठी पाठीवरील पंपाचा, ब्लोअर मशिनचा वापर केल्याचा नेहमी पाहण्यात येते. पण, नैताळे येथील आर्थव भोरने अनोखी शक्कल लढवत हा नवा प्रयोग आपल्या शेतीत केला.
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे योग्यवेळी पिकांना आणि द्राक्ष बागेला वेळेवर औषध फवारणी न करता आल्याने त्यांच्या शेतीला फटका बसला. त्यामुळे आथर्वच्या मनात ही गोष्ट कायम मनात होती. त्यानंतर त्याने युटूयबमध्ये अनेक व्हिडीओ बघितले व त्यातून ही नवी कल्पना त्याच्या मनात आली. पाठीवरील पंपावरुन औषध फवारणी करतांना जास्त वजनाचा पंप घेऊन सरीं मध्ये फिरावे लागते शिवाय हाताने पंप चालवतांना हाथ ही दुखतात. या अंगमेहनतीच्या कामामुळे शेतक-यांच दिवस भरात पूर्ण क्षमतेने काम होऊ शकत नाही. तर द्राक्ष बागेत फवारणी करतांना चिखला मुळे अनेक वेळा ब्लोअर ट्रॅक्टर चिखलात रुतात. त्यामुळे अडचणींचा सामना शेतक-यांना करावा लागतो आणि त्याचा अनुभव गेल्या वेळी आल्याने आर्थव याने पीव्हीसी पाईपचा एक सांगाडा तयार केला. जो पाठीवर लावता येईल त्याला एका बाजूला स्टिलच्या पाईपला चार हाय लेव्हलचे स्प्रे बसविले व त्याचा प्रयोग य़शस्वी झाला.अवघ्या २५०० रुपयात बनविलेल्या या फवारणी यंत्राची सध्या खूपच चर्चा आहे.