काठमांडू : नेपाळमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे पुष्पा कमल दहल ‘प्रचंड’ आणि माधव कुमार यांनी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या धोरणांविरोधात आपली राजकीय ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या संतप्त गटाने देशव्यापी संप पुकारला आहे. यातून कम्युनिस्ट पक्षामधील भांडण चव्हाट्यावर आले आहे.
प्रचंड यांच्या गटाचे पक्षाचे प्रवक्ते नारायण काझी श्रेष्ठ यांनी सांगितले की, घटनात्मक संस्थांसाठी सदस्य नियुक्त करणे बेकायदेशीर असून असंवैधानिक आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, नवीन नियुक्तीवर काळजीवाहू सरकारचा कोणताही घटनात्मक हक्क नाही. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात सत्ताधारी गटाने देशव्यापी संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. देशात संपाच्या वेळी वाहतूक सेवा, सर्व प्रमुख व संस्था बंद ठेवल्या जातील. हा संप पूर्णपणे शांततापूर्ण असेल.
नेपाळमधील राजकीय पेचप्रसंगाची परिस्थिती २० डिसेंबर रोजी उद्भवली होती. तेव्हा चीन समर्थक ओलीने संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. आता ओली आणि प्रचंड यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे नेपाळमध्ये राजकारण तापले आहे.