काठमांडू – नेपाळचा सत्ताधारी पक्षात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत नाट्यमय घटना घडत आहेत. या दोन गट पडलेले दिसत आहेत. कारण पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष पुष्प कमल दहल – प्रचंड यांना पदावरून दूर केले आहे. त्यामुळे पक्षात तणाव वाढला आहे.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ३० एप्रिल आणि १० मे रोजी मध्यावधी निवडणुका जाहीर करून नेपाळी संसद विसर्जित केली होती. यानंतर राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी अत्यंत तातडीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर या देशात राजकीय द्वंद्व चालू झाले आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी आता दोन गटात विभागली असून दोन स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. मागील २०१८ मध्ये दोन्ही राजकीय पक्ष विलीन झाले झाले होते. नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष (यूएमएल) ओली आणि नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओ) चे प्रमुख पुष्प कमल दहल प्रचंड होते.
दरम्यान, २०१८ मध्ये दोन्ही पक्षांचे विलीनीकरण झाल्यानंतर सोमवारपर्यंत सत्ताधारी पक्षाचे दोघेही गट एकत्र होते. पण आता ते दोन गटात विभागले गेले आहे. त्यापैकी एकाचे नेतृत्व पंतप्रधान ओली करीत आहेत तर दुसर्याचे नेतृत्व दहल करत आहे. या दोन्ही पक्षांनी आता आपापल्या केंद्रीय समिती, स्थायी समिती आणि पक्ष समिती स्थापन केल्या आहेत. गुरुवारी, ओली गटातील अशाच एका समितीने प्रचंड यांना पक्षाध्यक्षपदावरून काढून टाकले.