नेदरलॅंडसमधील ट्युलिप्स – “पृथ्वीवरील स्वर्गच”
“फुले ही जणु पृथ्वीवरील स्वर्गामधला उत्कृष्ट नमुना आहे”. नेदरलॅंडसमधील ट्यूलिप्स जेव्हा मी पाहिले तेव्हा या वाक्यावर माझा खरोखरच विश्वास बसला. नेदरलॅंडसला ट्यूलिप्समुळे “जगातील फुलांचे दुकान” म्हणूनही ओळखले जाते आणि मी तुम्हाला हे खात्रीने सांगू शकते की, हॉलंडमधील ट्यूलिपची सुंदर फील्ड पाहिल्यानंतर ज्याचे हृदय वितळत नाही असा जगामध्ये एकही मनुष्य नसावा. आपण स्वर्गात जाऊ शकत नाही म्हणूनच कदाचित देवाने पृथ्वीवर इतकी सुंदर फुले तयार केली असावी.

हेग, नेदरलॅंड