इंडिया दर्पण EXCLUSIVE
प्रणिता अ. देशपांडे
हेग, नेदरलॅंड
ईमेल-advpranita@gmail.comनेदरलॅंड मध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. अलिकडच्या आठवड्यात संक्रमणाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णालयांमध्ये आणि केअर होममध्ये कोविड -१९ च्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. आता शक्य तितक्या इतर लोकांशी संपर्क मर्यादित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच सरकारने नेदरलँडमध्ये हार्ड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळेच कालपासून (१५ डिसेंबर) येत्या १९ जानेवारीपर्यंत कडक लॉकडान लागू करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी (१४ डिसेंबर) हेगमधील पंतप्रधान कार्यालयातून जनतेला संबोधित करताना पंतप्रधान मार्क रुट्ट यांनी नेदरलँड्ससाठी नवीन कोरोना प्रतिबंधक उपायांची घोषणा केली. ख्रिसमसच्या वेळी कडक बंदोबस्त जाहीर केला. त्यांनी केलेल्या घोषणा अशा
१. संग्रहालये, चित्रपटगृहे, करमणूक पार्क, प्राणीसंग्रहालय, कॅसिनो, सौना, ईनडोअर खेळाची ठिकाणे आणि खाण्यापिण्याची सेवा देणारी संस्था (हॉटेलसमवेत) या कालावधीत बंद राहतील.
२. कपड्यांची दुकाने, शु शाॅप्स, दागिन्यांची दुकाने आणि हस्तकला वस्तू विकणारी दुकानेही बंद ठेवली जातील.
३. सुपरमार्केट, बेकरी, कसाई आणि इतर ज्या दुकानात अन्न विकले जाते ती दुकाने, फार्मसी, केमिस्ट आणि पेट्रोल स्टेशन यासारख्या आस्थापने उघड्या राहू शकतात.
- केशरचना आणि सौंदर्य सलून बंद राहातील.
५. केवळ वैद्यकीय आणि पॅरामेडिकल संपर्क-आधारित व्यवसायातील लोक आपले कार्य सुरू ठेवू शकतात.
६. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, माध्यमिक व्यवसाय शिक्षणासाठी शाळा (एमबीओ) आणि उच्च शिक्षण संस्था (विद्यापीठे आणि एचबीओ) वैयक्तिक संपर्क कमी करण्यासाठी ऑनलाइन शिक्षण देतील.
७. चाईल्डकेअर सेंटर देखील बंद असतील परंतु त्यात काही अपवाद क्षेत्र आहेत.
८. एकमेकांना पाठिंबा देणे आणि सन २०२१ मध्ये कोरोना विषाणूच्या प्रसाराला तोंड देण्यासाठी सरकारच्या कठोर उपायांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे.