रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नेटवर्कअभावी ग्रामीण भागात शिक्षण प्रभावित

by India Darpan
सप्टेंबर 17, 2020 | 12:32 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200917 WA0021 1

नाशिक – कोरोनाविषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणपध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन शिक्षणप्रणाली गतिमान करण्यासाठी जिल्हा परिषदेने मोबाईल टॉवर जोडणीच्या कामांना प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या बैठकित पालकमंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर,आमदार डॉ. नितीन पवार, आमदार किशोर दराडे, आमदार नरेंद्र दराडे, मालेगावच्या महापौर ताहेरा शेख, उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, माध्यमिक शिक्षण अधिकारी वैशाली झनकर, प्राथमिक शिक्षण अधिकारी राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा वैद्यकिय अधिकारी डॉ.कपिल आहेर उपस्थित होते.
 भुजबळ म्हणाले की, कोरोनाकाळात कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,यासाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरु करण्यात आली. ग्रामीण भागात व आदिवासी भागात नेटवर्कची समस्या असल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पुरेशा प्रमाणात घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल टॉवरच्या जोडणीचे काम प्राधान्याने करण्यात यावे. तसेच जिल्हा परिषद शाळांबरोबरच खाजगी शाळेतही सुरु असलेल्या ज्ञान दानाचा कामाचा आढावा शिक्षण विभागाने वेळोवेळी घ्यावा. याबरोबरच आंतरजिल्हा बदली होवून गेलेल्या शिक्षकांच्या जागेवर नव्याने आलेल्या शिक्षकांनाही तत्काळ रुजू करुन घेण्याबाबतची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.
जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती तसेच अतिरिक्त वर्ग खोलीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीबाबत पाठपुरावा करण्यात येईल,तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या वर्ग खोल्यांचे नुकसान झालेले आहे त्याकडेही लक्ष देवून दुरुस्त्या करुन घेण्याबाबतचे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना ‍ भुजबळ यांनी दिले.
शिक्षण विभागाचे कौतुक
कोरोनाच्या काळात शाळा बंद असतांनाही जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांना शिक्षण पोहचविण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. त्यामध्ये तंत्रसेतू ॲप, व्हाटसॲप, ऑनलाईन झुम, जिओ मीट, गुगल क्लासरुम इत्यादी वापरण्यात आलेली ऑनलाईन माध्यमांचा प्रभावी वापर केला. परंतु त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देता येवू शकत नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन ओट्यावरच्या शाळा, गल्ली मित्र, गृहभेटी सारखे स्तुत्य उपक्रम राबविल्याचे सांगून पालकमंत्री भुजबळ शिक्षण विभागाचे कौतुकही केले.
जनजागृती करा
कोरोनाचा वाढत प्रादूर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्येही या आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत. तसेच  प्रत्येक शिक्षकाने ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून किंवा ऑफलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम, मुखपट्टीचा वापर , वांरवार हात सॅनिटाईस करण्याबाबतची जनजागृती करावी, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
शाळांची दुरुस्ती
जिल्हा परिषदेची ३२७ अतिरिक्त वर्ग खोलींची मागणी आहे. १ हजार ७६५ शाळेंच्या वर्ग खोलींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्त्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधी मधून करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये इमारतींचे काम, स्वच्छतागृह, पिण्याचे पाण्याची सोय व विद्युतीकरणाची कामे करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डांगसौंदाणे परिसरात मक्याच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांनी केली पाहणी

Next Post

ऑक्सिजनअभावी स्टील उद्योग संकटात; हजारो कामगारांवर टांगती तलवार

Next Post
NPIC 2020913193916

ऑक्सिजनअभावी स्टील उद्योग संकटात; हजारो कामगारांवर टांगती तलवार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
Gt ArXoXMAArHyz e1750556062941

शोलेत अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवली…जितेंद्र आव्हाड यांची ही पोस्ट चर्चेत

जून 22, 2025
crime1

कारमधून आलेल्या कुटुंबियांनी लाकडी बॅट व लाठ्याकाठ्यांनी केली बेदम मारहाण…नेमकं घडलं काय

जून 22, 2025
Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011