नवी दिल्ली – बँक खाते आहे परंतु नेट बँकिंग सुविधा वापरत नाहीत अशा ग्राहकांसाठी अटल पेन्शन योजनेसाठी खाते उघडणे लवकरच सोपे होणार आहे. ग्राहकांची ऑनबोर्डिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (पीएफआरडीए)ने पर्यायी व्यवस्था सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या अंतर्गत कोणीही नेटबँकिंग किंवा मोबाइलअॅप वापरल्याशिवाय अटल योजनेचे खाते उघडू शकते.
सध्या काही बँका नेटबँकिंग किंवा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाईन एपीवाय खाते उघडत आहेत. मात्र, एपीवाय अंतर्गत नोंदणीकृत बहुसंख्य बँक खातेधारक नेटबँकिंग किंवा मोबाइल अॅप सुविधेचा वापर करीत नाहीत. बँकांचे वेब पोर्टल वापरणार्या एपीवाय ग्राहकांच्या बोर्डिंगवर पीएफआरडीएमार्फत ऑनलाईन पेपरलेस यंत्रणा सुरू केली गेली आहे. बँक खातेधारकास एपीवाय ऑनबोर्डिंग सुविधा पुरविणार्या बँकेच्या पोर्टलवर जाऊन ग्राहक ओळखपत्र किंवा बँक खाते क्रमांक किंवा पॅनकार्ड, आधारकार्डची माहिती देऊन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी लागेल. नोंदणी पूर्ण करण्यासाठी ओटीपी पद्धतीचा वापर होणार आहेत. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर वेबफॉर्ममध्ये प्रविष्ट होणार आहे. पेन्शनची रक्कम, ऑटोडेबिटची वारंवारता, नावनोंदणी आदी माहिती भरता येणार आहे. नेट बँकिंगची सुविधा वापरण्यास सक्षम नसलेल्या मात्र रिटायमेन्टच्या दृष्टीने विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे.