नाशिक – नूतन त्रंबक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचा ६८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक, कुणाल गोराणकर होते. त्यांच्या हस्ते महात्मा गांधी विद्यामंदिर या संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे प्रा. विजयसिंग कचवे, वसतिगृह अधीक्षक अशोक जाधव , नंदू देवरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .
याप्रसंगी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक महेश पाटील,धनंजय देवरे , कैलास ठोमरे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेतला. या प्रसंगी विद्यालयातील सेवानिवृत्त क्रिडाशिक्षक, सुधीर जाधव यांचा सेवापूर्ती निमित्ताने विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर, सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील भामरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर यांनी परिश्रम घेतले.