पिंपळनेर, ता. साक्री
पिंपळनेर माळमाथा परिसरातील तसेच पश्चिम पट्ट्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मका,बाजरी,कपाशी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी पिंपळनेर शिवसेनेने केली आहे. यासंदर्भातील निवेदन नायब तहसीलदारांना देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, पिंपळनेर तालुकाप्रमुख हिम्मत साबळे, शिवसेना तालुका संघटक अमोल सोनवणे, माजी तालुकाप्रमुख किशोर वाघ, वाहतूक सेनेचे ज्ञानेश्वर पगारे, पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी, युवासेनेचे अमोल क्षीरसागर, मनोज खैरनार, अभय शिंदे, पंकज जाधव, राहुल पाटील, खुशाल वाडेकर, कल्पेश पाटील, राधे पाटील, रिंकू देवरे, उदय माळी, राहुल सूर्यवंशी आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.