नाशिक – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सटाणा तालुक्यातील गारपीटग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. सरकार कडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
दरेकर पाहणी दौऱ्यानंतर म्हणाले की,
– शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही सभागृहात मांडत आहोत
– जिल्हा बँके कडून मुद्दली पेक्षा कितीतरी व्याज आकारले जात आहे
– शेतकऱ्यांच्या असंख्य तक्रारी आहेत
– जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढू नये.
– जिल्हा बँकेने अडचणीत आलेल्या कर्जदाराला कर्जाची पुनर्बांधणी करावी. त्यासाठी आम्ही सरकारला भाग पडण्यास प्रयत्न करू
– भोगवटाधार २ च्या जमिनी १ करण्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत.
– शेतकऱ्याला ओ.टी.एस द्यावा
– आजच्या दौऱ्या नंतर सरकार हललेलं दिसेल, याची मी ग्वाही देतो.
– नाशिकचा शेतकरी हिम्मतवान आहे, तो उभारी घेण्याची ताकद बाळगून आहे.
– सरकारेन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष लक्ष घालावे
– अवकाळीच्या नुकसानीचे केवळ ५०-६० टक्केच पंचनामे झालेले दिसत आहेत.
– शासनाने गारपिटीमुळे नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख रु नुकसानभरपाई द्यावी
– शेतकऱ्यांनी आत्महत्या करून विषय सुटणार नाहीत.
– शेतकऱ्यांच्या तीव्र भावनांची दखल मी शासनाला घ्यायला लावेल.