हैदराबाद- येथील ट्रान्सस्ट्रॉय इंडिया लिमिटेड कंपनी आणि त्याच्या संचालकांविरूद्ध ७ हजार ९२६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापुर्वीच्या देशातील मोठ्या बँक घोटाळ्यांमध्ये सामील असलेल्या नीरव मोदी प्रकरणापेक्षा हे प्रकरण मोठे आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) या तपास यंत्रणेने ही माहिती दिली.
या संदर्भात सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले की, कथीत कंपनी आणि संशयीत आरोपी संचालकांच्या जागेची झडती घेतली घेतली असता बनावट कागदपत्रे सापडली. कंपनीचे अध्यक्ष-सह-व्यवस्थापकीय संचालक चेरुकुरी श्रीधर आणि अतिरिक्त संचालक रायपती सांबसिवा राव आणि अक्केनेनी सतीश यांचे नाव त्यात आहेत, हैदराबादस्थित खासगी कंपनी आणि त्याच्या संचालकांनी विविध बँकिंग व्यवस्थेखाली कर्ज घेतले असा आरोप आहे.
दरम्यान, सीबीआयचे प्रवक्ते आर. के. गौर म्हणाले की, या प्रकरणात एका बँकांचा बनावट गट तयार झाला असून त्यांची लेखा पुस्तके फसवी होती, स्टॉक स्टेटमेन्ट्स बनावट होते. तसेच ताळेबंदात छेडछाड केली गेली आणि ही रक्कम काढून घेण्यात आली. सदरसंचालकांनी बँकेच्या सदस्यांना ७ हजार ९२६ कोटी रुपयांची उधळपट्टी करून पैसे चोरले असा आरोप त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच हैदराबाद व गुंटूरमधील खासगी कंपनीच्या आणि इतर आरोपींच्या जागेची झडती घेण्यात आली.