मुंबई – पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहूल चौकसी आणि नीरव मोदी यांना गेल्या अनेक दिवसांपासून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवारी लंडनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारत प्रत्यार्पणाचा रस्ता मोकळा केला आहे. तसेच नीरव मोदीची याचिकाही लंडनच्या न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
लंडन न्यायालयाने म्हटले की, भारताची न्यायपालिका निःपक्ष आहे. बँकेत फ्रॉड करून देश सोडून पळालेल्या नीरव मोदीला प्रत्यार्पणासाठी मुंबईत आणले जाईल. असेही सांगितले जात आहे की त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठेवले जाईल.
मुळात हा घोटाळा कळला कसा याबाबत कमालीची उत्सुकता आहे. ते जाणून घेऊया…
कसा कळला घोटाळा?
देशातील सर्वांत मोठे बँकिंग फ्रॉड त्यावेळी जगापुढे आले जेव्हा पंजाब नॅशनल बँकने स्टॉक एक्स्चेंजला मुंबई शाखेत झालेल्या 11000 कोटी रुपयांच्या बनवाट व्यवहाराची माहिती दिली. यामुळे अर्थमंत्रालयात तर भुकंप आलाच शिवाय इतर सरकारी बँकांवरही चौकशीची गदा येण्याची शक्यता निर्माण झाली.
पण त्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की रिझर्व्ह बँक आफ इंडिया आणि बँकेतील दिग्गज अधिकारी असताना एवढा मोठा घोटाळा कसा शक्य झाला. मात्र हा संपूर्ण घोटाळा उघडकीस आणण्यासाठी एकच कागद कारणीभूत ठरला. अर्थात लेटर आफ अंडरटेकिंग (एलओयू).
लेटर आफ अंडरटेकिंग आंतरराष्ट्रीय बँक किंवा भारतीय बँकेच्या आंतरराष्ट्रीय शाखेच्या वचीते जारी करण्यात येत असते. या पत्राच्या आधारावर बँक, कंपन्यांना 90 ते 180 दिवसांसाठी शॉर्ट टर्म कर्ज देऊ शकतात. या पत्राच्या आधारावर कोणतीही कंपनी जगाच्या कोपऱ्यात कुठेही ही रक्कम काढू शकते. या पत्राचा वापर बहुतांश आयात करणाऱ्या कंपन्या करतात.
लेटर आफ अंडरटेकिंग कोणत्याही कंपनीला लेटर आफ कम्फर्टच्या आधारावर दिले जाते. हे लेटर कंपनीचे अस्तित्व असलेल्या स्थानिक शाखेतून दिले जात असते.
असा केला फ्रॉड?
पंजाब नेशनल बँक घोटाळ्यात या पत्राचाच वापर करण्यात आला आहे. दागिण्यांचा डिझायनर नीरव मोदी याने आपल्या फर्मच्या आधारावर पंजाब नॅशनल बँकेतून एक बनावटट पत्र प्राप्त केले.
बनावट यासाठी कारण हे पत्र बँकेच्या केंद्रीकृत यंत्रणेतून देण्यात आले नाही आणि पत्र देताना कुठलीही मर्यादा आखून देण्यात आली नाही. पत्र जारी झाल्यावर त्याची माहिती स्वीफ्ट कोड मेसेजिंगद्वारे सर्वांना पाठविण्यात आली.
नीरव मोदीने विदेशात विविध सरकारी आणि खासगी बँकांमधून या पत्राच्या आधारावर पैसा उचलला. ही रक्कम एकूण 11 हजार कोटी रुपये एवढी होती.
उघडकीस कसे आले?
कंपन्यांनी पैसे भरले नाही तर पे आर्डरप्रमाणेच लेटर आफ क्रेडीटसुद्धा संबंधित बँकांमध्ये पाठविण्यात येते. पंजाब नॅशनल बँकेकडे वसुलीसाठी लेटर आफ अंडरटेकिंग आले तेव्हा बँकेने पैसे देण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर पूर्ण प्रकरण उघडकीस आले. या घोटाळ्याचा खुलासा यातील एक आरोपी असलेल्या अधिकाऱ्याच्या निवृत्तीनंतर झाला. पीएनबीमध्ये लेटर आफ अंडरटेकिंग ज्युनियर अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने घेण्यात आले.
केतन पारेख प्रकरण असेच होते
2010 मध्ये असाच एक घोटाळा झाला होता. बँकर केतन पारेखने सिस्टीमचा फायदा घेत हा आर्थिक गैरव्यवहार केला होता. त्यावेळी माधवपुरा मर्केंटाईल को–आपरेटीव्ह बँकेने कुठलिही सिक्युरिटी आणि मार्जीन मनी शिवाय केतन पारेखच्या कंपनीला लेटर आफ अंडरटेकिंग दिले होते.