नवी दिल्ली – नीट व जेईई या दोन परीक्षा पुढे ढकलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. नीट १३ सप्टेंबरला तर जेईई १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची याचिका होती. मात्र सुप्रीम कोर्टाचा नकार दिल्यामुळे या परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तर, प्रशासनाला परीक्षा केंद्र, विद्यार्थी केंद्रापर्यंत येण्यसाठीची वाहतूक व अन्य सुविधांचे नियोजन करावे लागणार आहे.