नाशिक – जेईई पाठोपाठ नीट २०२० परीक्षेला हिरवा कंदील मिळाल्या नंतर रविवारी ( १३ सप्टेंबर ) दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील ४४ परीक्षाकेंद्रांवर १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मात्र, ही परीक्षा देताना काही बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी कोविड १९ च्या सर्व नियमाचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहे. संबंधित परीक्षा केंद्रांवर ३ तास आधी टप्प्या टप्याने प्रवेश दिले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे अनिवार्य आहे. एका वर्गात केवळ १२ विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. ओळखपत्र तसेच संबंधित कागदपत्र तपासणीसाठी विशिष्ट सुविधा करण्यात आली आहे. पहिले विद्यार्थी रूमबाहेर निघाल्यावर बाकी विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने केंद्रावर येते वेळी मास्क लावून येणे बंधनकारक आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर होणार स्वतंत्र परीक्षा…
ठरविक वेळेत विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. सकाळी ११ पासून नमूद दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजले जाणार आहे. ३७.४ अंश सेल्सियसपेक्षा जास्त असल्यास ठरविक वेळ विद्यार्थ्याना विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे, त्यानंतर स्वतंत्र खोलीत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे.
परीक्षा केंद्रावर जातांना…
प्रत्येक विद्यार्थ्याकडे मास्क तसेच हॅन्ड ग्लोज असणे अनिवार्य आहे त्याशिवाय परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणारा नाही. पाण्याची वयक्तिक ट्रान्स्परंट बाटली, छोटी सॅनिटायझरची बाटली सोबत असणे आवश्यक आहे. तसेच ओळखपत्र व संबंधित कागदपत्र सोबत ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.
चांगली माहिती दिली आहे