नवी दिल्ली – राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) चा निकाल अखेर जाहीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा निकाल उपलब्ध झाला आहे. ओडिसा येथील शोएब आफताब याने तब्बल १०० टक्के गुण मिळविले आहेत. आतापर्यंत एकाही विद्यार्थ्याला १०० टक्के गुण मिळविले नव्हते. शोएबला ७२० पैकी ७२० गुण मिळवून इतिहास रचला आहे.
निकाल पाहण्यासाठी
ntaneet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
हे करा
रिझल्ट या पर्यायावर क्लिक करावे
अर्ज क्रमांक (अॅप्लिकेशन नंबर), जन्म दिनांक आण् सिक्युरिटी पीन टाकावा आणि सबमिट करावे
त्यानंतर आपल्याला निकाल पहायला मिळेल