नाशिक – सैनिकांच्या कल्याणासाठी स्वतःचे स्त्रीधन देणाऱ्या माजी आमदार डॉ. निशिगंधा मोगल यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
काही वर्षांपूर्वी कारगिल येथे पर्यटनासाठी गेलेल्या डॉ. मोगल यांनी तेथील सैनिकांची कामगिरी बघितली. त्यानंतर सोने विकून आलेल्या २० लाख रुपयांचा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी म्हणून सुपूर्द केला. सैनिकी बोर्डद्वारे या मदतीबद्दल डॉ. निशिगंधा मोगल यांना पत्र पाठवून आभार मानले आहे
मोगल यांनी त्यांच्या मंगळसूत्राचे पैसे सैनिकांसाठी दिले. त्यामुळे विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांनीही ट्वीट करुन मोगल यांचे कौतुक केले आहे.