मुंबई – बंगालच्या उपसागरात बनत असलेल्या ‘निवर’ या चक्रीवादळामुळे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, उस्मानाबाद, लातूर, नांदेड बीड, अहमदनगर, पुणे आदी जिल्हांमध्ये या आठवडय़ात ढगाळ वातावरण, पाऊस व धुके वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान अभ्यासक प्रा किरणकुमार जोहरे यांनी केले आहे. उत्तरे कडील पश्चिमी विक्षोभ म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स या थंड वार्यांच्या प्रभावामुळे उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ात देखील धुके व पाऊस दिसून येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
विदर्भ व मराठवाडा
तसेच विदर्भात व मराठवाडय़ात गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशीम, नागपूर, जालना औरंगाबाद, हिंगोली, परभणी, अकोला, परभणी आदी जिल्हातील काही भागात देखील येत्या आठवड्यात विस्कळीत स्वरूपात पाऊस तसेच काही ठिकाणी पावसा बरोबर गारा पडू शकतील असे ही त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे, जळगाव व नाशिकच्या काही भागात विस्कळीत स्वरूपात पाऊस होऊ शकेल.
शेतकऱ्यांनी घाबरू नये
शेतकऱ्यांनी घाबरुन न जाता परीस्थितीचा सामना करावयाचा आहे. कारण आताशी मान्सून संपत आला आहे. पावसाळा संपत आल्याची ही ‘चाहूल’ आहे. तसेच यानंतर अजूनही वादळांचा आपल्याला डिसेंबर 2020 व जानेवारी 2021 मध्ये सामना करावा लागणार आहे असे विज्ञान देखील भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
द्राक्ष व कांदा शेतीला धोका
विशेषतः द्राक्ष, कांदा आदी शेतीला मोठा फटका या पावसामुळे बसू शकतो. उघड्यावरील अन्नधान्य तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून झाकून ठेवणे तसेच छुके वाढल्यावर सुरक्षित पद्धतीने शेकोटी पेटवणे हे उपाय शेतकरी करु शकतात. यावर्षी मान्सून 15 डिसेंबर 2020 पर्यंत लांबल्याने रब्बी हंगाम उशिरा सुरू होत असल्याने आपल्या अनुभवानुसार शेतकर्यांनी सुयोग्य पिक नियोजन करावे त्यांचे असे ही हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
का निर्माण होईल ‘निवर’ चक्रीवादळ?
जेव्हा वातावरणात अस्थिरता निर्माण होते आणि वारे गोलाकार फिरु लागतात तेव्हा हवेत भवरे किंवा इंग्रजीत शास्त्रीय भाषेत इडीज तयार होऊन चक्रीवादळ बनते. मान्सून परतत आहे याचे हे एक दर्शक परीणाम आहे. १५ आॅगस्ट २०२० ला महाराष्ट्रात मान्सून खर्या अर्थाने सुरू झाला व चिर महिन्यानंतर म्हणजे १५ डिसेंबर २०२० ला तो संपेल. सध्या मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून परतीचे ईशान्य मोसमी वारे आता वाहू लागले आहेत याचा परीणाम महणून आता चक्रीवादळे निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे. मान्सून परतत असतांना २०२१ या वर्षी तयार झालेले हे पहिले चक्रीवादळ उठले आहे मात्र हे यावर्षीचे शेवटचे चक्रीवादळ नसेल. येत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात अजून चक्रीवादळे निर्माण होतील. यानंतर देखील डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये चक्रीवादळे आणि त्यामुळे ठराविक कालावधीचा पाऊस पडतांना आपल्याला अनुभव घ्यावा लागेल अशी वैज्ञानिक माहिती भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी दिली.