सुधारित सूचनांमधले ठळक मुद्दे असे आहेत-
ए – प्रसिद्धीसाठी सुधारित कालमर्यादा
सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार उमेदवार आणि त्याला उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षाने, उमेदवाराला गुन्हेगारी विषयक पूर्वेतिहास असल्यास त्याचा तपशील वर्तमानपत्रे आणि दुरचित्रवाणीवर खालील पद्धतीने जाहीर करावा :
१- प्रथम प्रसिद्धी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या पहिल्या चार दिवसात
२- दुसरी प्रसिद्धी : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या पाच ते आठ दिवसात
३- तिसरी प्रसिद्धी : नवव्या दिवसापासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजेच मतदानाच्या तारखेच्या दोन दिवस आधी.
यामुळे या माहितीच्या आधारावर मतदारांना त्यांचा पर्याय निवडण्यासाठी मदत होईल.
बी- बिनविरोध विजयी ठरणारे उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांनीही त्या उमेदवाराला गुन्हेगारी पूर्वेतिहास असल्यास, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराप्रमाणेच तो प्रसिद्ध करायचा आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या सूचना त्वरित लागू होतील, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.