नवी दिल्ली – बिहार विधानसभा आणि हैदराबाद महापालिकाच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण यश मिळवल्यानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळेच भाजपने आता तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांच्या आक्रमक तयारीला सुरुवात केली आहे.
तामिळनाडूमधील चित्रपट अभिनेता रजनीकांत यांच्या राजकीय तयारीवर भाजप नजर ठेवून आहे. तसेच तेथील अंतिम रणनीती पुढील महिन्यात ठरविण्याचा भाजपचा विचार असला तरी पक्ष सध्या एआयएडीएमके बरोबर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. कोरोना काळात बिहारमध्ये युतीने मोठा विजय मिळवून भाजपने आपली ताकद वाढवून सत्ता मिळविली. तसेच हैदराबादच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून त्यांनी आपली आक्रमक रणनीती दाखविली आहे.
भाजपाने आता पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडूसारख्या महत्त्वाच्या निवडणुकात जोरदार तयारी सुरू केली आहे. आसाममध्ये त्यांचे विद्यमान सरकार आहे. मात्र पश्चिम बंगालची निवडणूक त्यांच्याकरिता महत्वाची ठरणार आहे. त्यांनी सत्ता परिवर्तनासाठी संपूर्ण ताकद लावणार आहे. यासाठी पुढच्या महिन्यात पक्ष रणनीती तयार करतील
दरम्यान, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि मिशन २०२१ चे मैदान तयार करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा विविध राज्यांच्या १२० दिवसांच्या दौर्यावर जाणार आहेत. त्यानंतर पक्ष थेट आसाम, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये निवडणुका लढवेल, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.