नवी दिल्ली – वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तामिळनाडू सरकारनं ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना निर्बंध किंवा इतर नियमांचं उल्लंघन करणार्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्यानं राज्य सरकारकडून पावलं उचचली जात आहेत. महाराष्ट्रातही संसर्ग वाढत असून, एका दिवसात ८,६२३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी दक्षता आवश्यक
तामिळनाडू सरकारकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात म्हटलं की, कोरोनाला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशानं ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करताना तोंडाला मास्क लावणं अनिवार्य आहे. सार्वजनिक जागी आणि दुकानांमध्ये शारिरीक अंतर राखणं आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास दंड करण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग
आदेशात म्हटलं की, सार्वजनिक ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग आवश्यक आहे, सोूबतच हातधुण्यासह सॅनिटायझरचा वापर गरजेचा आहे. सार्वजनिक ठिकानांना वेळोवेळी सॅनिटाइझ करणही गरजेचं आहे. दरवाजांचे हँडलसह मानवी स्पर्श होणार्या सर्व ठिकाणी सॅनिटाइझ करणं आवश्यक आहे. कामांच्या ठिकाणी शारिरीक अंतर राखण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
चेन्नईमध्ये १८२ नवे रुग्ण
तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये १८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या २,३५,५३२ इतकी झाली आहे. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत १.७४ कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी सोमवारी व्यापक तयारी करण्यात आली आहे.
मराठवाड्यात प्रतिबंध कायम
कोरोना संसर्गाचा वेग पाहता राज्यातील मराठवाड्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हिंगोलीध्ये सोमवारपासून (१ मार्च) ७ मार्चपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. यादरम्यान शाळा, महाविद्यालये, धार्मक स्थळे आणि कार्यक्रमांची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. बँकांमध्ये फक्त प्रशासकीय कामे केले जातील. हिंगोलीत शनिवारी (२७ फेब्रुवारी) रोजी ४६ नवे रुग्ण आढळले होते.
पुण्यात १४ मार्चपर्यंत प्रतिबंध कायम
पुणे जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध १४ मार्चपर्यंत वाढवले आहेत. रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत बंदी कायम असेल. शैक्षणिक संस्थासुद्धा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात शनिवारी १,५०५ नवे रुग्ण आढळले होते.