नवी दिल्ली – एका सरकारी शिक्षकाने पत्नीपासून तलाक घेण्यासाठी चक्क पत्नीचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याची बाब समोर आली आहे. पिडीतेच्या भावाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली मधील सुभाषनगर परिसरात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०१८ रोजी पीलीभीतमधील रहिवासी युवकाशी पिडीतेचे लग्न झाले. पतीचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध होते. तसेच, हुंड्यासाठी तो पिडितेला छळत होता. त्याने खुप त्रास देणे सुरु केले आणि खोटे आरोप केले. केवळ तलाक मिळावा म्हणून तो हे सारे उद्योग करीत होता. मात्र, पत्नी तलाक देत नसल्याचे पाहून शिक्षक पतीने एका महिलेच्या माध्यमातून पत्नीचा अश्लिल व्हिडिओ काढला. तुझ्या बहिणीपासून मला तलाक मिळवून दे नाही तर मी तुझ्या बहिणीला बदनाम करेल, अशी धमकी शिक्षक पतीने पिडीतेच्या भावाला दिली. त्यानंतर शिक्षक पतीने हा व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.