नाशिक – जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत आहे. सध्या दररोज सुमारे तीन हजार क्विंटल आवक होत असून ती पुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून घसरत आहेत. गेल्या आठ दिवसांत कांद्याचे दर सरासरी एक हजार रूपयांनी कमी झाले आहेत. कांद्याची निर्यात कमी होत असून देशांतर्गत मागणी कमी झाल्यानेही भाव कमी होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.