नवी दिल्ली : सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप केला होता. यामुळे ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने या प्रकरणी चौकशीस सुरुवात केली होती. आताही निर्माता दिनेश विजन याने सुशांत सिंग याला दिलेल्या १७ कोटी रुपयांप्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात आली. सुशांतने दिनेशसोबत ‘राबता’ चित्रपटात काम केले होते. त्यासाठी हे पैसे देण्यात आले होते. २०१७ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हे पैसे दिल्याची कागदपत्रे ईडीने विजन यांच्याकडे मागितली होती. मात्र, ही कागदपत्रे देण्यास विजन अपयशी ठरले होते. यामुळे ईडीने गेल्या महिन्यात दिनेश यांच्या घरी तसेच कार्यालयातही तपास केला होता. सध्या दिनेश विजन दुबई येथे असल्याचे कळते.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे खर्च केल्याची काही कागदपत्रे या तपासात मिळाली होती. त्यानुसार चित्रपटाचे बजेट ५० कोटी होते, आणि १७ कोटी रूपये सुशांत सिंग राजपूतला देण्यात आले होते.