मुंबई – गेल्या महिनाभरापासून निर्बंध उठवल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टाळेबंदी हटवण्याच्या प्रक्रीयेसंदर्भात खूप दक्षता घेत आहेत. निर्बंध काढले जात असले तरी मागणी नंतरही धार्मिक स्थळं, चित्रटगृह, व्यायामशाळा उघडण्यात आल्या नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणुचे रुग्ण शोधणे, त्यांच्या चाचण्या आणि उपचारांमध्ये राज्य सरकारच्या अग्रेसर भूमिकेमुळे गेल्या महिनाभरात या संसर्गाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडल्याचे टोपे म्हणाले. या चाचणीसाठी ४०० प्रयोगशाळा कार्यरत असून दररोज ५० हजार चाचण्या होत आहेत, असे त्यांनी नमुद केले.