नवी दिल्ली – केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधील चर्चेची ११ वी फेरीही निष्फळ ठरली आहे. या बैठकीत फेरीनंतर आज कुठलाही तोडगा निघाला नाही. मात्र, सरकारने शेतकरी नेत्यांना सर्व पर्याय दिले आहेत. आता त्यांनीच काय तो निर्णय घ्यायचा आहे, असे कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले आहे.
कृषी कायदे दीड वर्षांसाठी स्थगित करण्याचा प्रस्ताव काल केंद्र सरकराने शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्या दरम्यान या कायद्यांबाबत सखोल चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करु, असे आवाहन कृषीमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना केले होते. मात्र संयुक्त किसान मोर्चाच्या आज झालेल्या बैठकीत हे कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर शेतकीर नेते ठाम राहिले. त्यामुळे कुठलाही तोडगा निघाला नाही.