नवी दिल्ली – इंटरनेट युजर्सच्या वाढीमुळे ऑनलाईन फ्रॉड आणि हॅकिंगची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत फसवणूक टाळण्यासाठी इंटरनेट वापरताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये यासाठी तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही टिप्स…
वेगळा पासवर्ड तयार करा
आजच्या काळात लोक बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतात, म्हणूनच ते सर्व खात्यांसाठी बहुतांश वेळा सारखा पासवर्ड ठेवतात. परंतु, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी वेगळा पासवर्ड ठेवावा असे तज्ज्ञांचे मत आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भिन्न भिन्न पासवर्ड दिल्यास वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते.
वेबसाइट URL तपासणे आवश्यक
कोणत्याही वेबसाइटला भेट देत असल्यास जात असल्यास, विशेषतः बँकेचे व्यवहार ऑनलाईन करतेवेळी संबंधित वेबसाइटची URL नेहमी तपासा. जर ती URL https ने सुरू होत असले तर वेबसाईट सुरक्षित असल्याचे समजावे. या व्यतिरिक इतर कोणत्याही वेबसाईटद्वारे बँकेचे व्यवहार करू नये अन्यथा फसवणूक होण्याच्या शक्यता जास्त असतात.
फ्री wifi वापरू नका
बहुतांशवेळा ऑनलाईन पेमेंट किंवा बँकांच्या कामकाजावेळी फी wifi वापरण्याची पद्धत अनेकांना असते मात्र याद्वारे आपल्या मोबाईलमधील माहिती सार्वजनिक होण्याच्या शक्यता जास्त असल्याचे सायबर तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बँकेची माहिती सामायिक करू नका
बँकेचे व्यवहार करतेवेळी पासवर्ड किंवा ओटीपी लिहून ठेवण्याची सवय अनेकांना असते. मात्र याद्वारे देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बँकेचे व्यवहार तिऱ्हाईक व्यक्तीला सांगू नये असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.