नाशिक – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक कार्यालय येथे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे हे रुजू झाले. त्यांचे स्वागत निमातर्फे करण्यात आले. या भेटीत विविध प्रश्नांवर पदाधिका-यांनी चर्चा केली. या भेटीत निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर व कार्यकारिणी सदस्य संजय महाजन उपस्थित होते.
या भेटीत अंबड येथील एस सेक्टर येथील रस्त्यांचे नाशिक महानगर पालिकेस हस्तांतर करणे, सिन्नर येथील नवीन ले आउट बाबत चर्चा झाली. राजूर बहुला येथे लवकरात लवकर जागा ताब्यात घेऊन उद्योगासाठी उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी निमा शासन दरबारी पाठपुरावा करेल असेही सांगण्यात आले. आक्राळे दिंडोरी येथे प्लग अँड प्ले तत्वावर विकसित करण्याचे काम किती झाले याची माहिती यावेळी घेण्यात आली. अभियंता जयवंत बोरसे यांनी या भेटीत सकारात्मकता दाखवत वेळोवेळी निमाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नाशिकच्या विकासात भर घालण्यासंबंधात आश्वासन दिले.