नाशिक – नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) व इतर संस्थांच्या वतीने देशपातळीवर संवेदना महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराद्वारे तब्बल ९ लाख रक्तथैली संकलनाचा जागतिक विक्रम नोंदविला जाणार आहे. या शिबिराचे उद्धाटन महामहिम राष्ट्रपती मनाथ कोविंद यांचे हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारा होणार आहे.
मागच्या महिन्यापासून कोरोना ने पुन्हा डोके वर काढले असून कॉलेज बंद, मंदिरे बंद, औद्योगिक क्षेत्रामध्ये सुध्दा शिबीरे होत नाही त्यामुळे आज रोजी रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २३ मार्च रोजी शहिद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची पुण्यतिथी आहे.
या निमित्ताने नॕशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन, नाशिक शाखा म्हणजेच निमा द्वारा रक्तदान शिबिराचे आयोजन विभागीय संदर्भ सेवा रुग्णालाय, शालिमार येथे मंगळवार, २३ मार्च रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आले आहे…तरी नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान करावे आणि गरजु रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन निमाने केले आहे.
