नाशिक – निमा पदाधिका-यांतर्फे दाखल ४१ अ अर्ज क्र १०६४/२०२० व फेरफार अर्जाविरोधात असलेले आक्षेपाबाबत सहा आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने धर्मादाय उपायुक्त यांना दिले. निमाच्या वादाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. धनुका व न्यायाधीश माधव जामदार यांनी त्यावर हा निर्णय दिला.
मुंबई उच्च न्यायालयात विवेक गोगटे यांनी ही याचिका दाखल केली होती. यात निमा तर्फे चार्ज मिळाला नाही हा मुख्य मुद्दा होता. त्याची सुनावणी मंगळवारी झाली. त्यात निमाचे पदाधिकारी अध्यक्ष शशिकांत जाधव, माननीय सरचिटणीस तुषार चव्हाण, उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, खजिनदार कैलास आहेर, सहसचिव सुधाकर देशमुख यांच्या तर्फे वकील अशोक ताजणे यांनी काम पाहिले. यात त्यांनी बारा पानी उत्तर शपथपत्रकासह दाखल केले. त्यानंतर हे निर्देश देण्यात आले.