नाशिक – शासकीय कामकाजासाठी घराचा नकाशा व उतारा देण्यासाठी निफाड तालुक्यातील सायखेडा येथील भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक हरीभाऊ शेळके हे तीन हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली. शेळके यांनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. पण, तडजोडी अंती तीन हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाला सांगितले. त्यानंतर साफळा रचून ही कारवाई करण्यात आली. नाशिक परिक्षेत्र विभागाचे पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी याबाबत माहिती दिली.