निफाड – निफाड जवळ असलेल्या श्रीरामनगर परिसरात दुपारी ३ वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची कामगारांची प्रचंड धावपळ झाली. या धावपळीतच शेती काम करत असतांना स्मिता वसंत शिंदे (वय ३५) या महिलेचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.