कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत
– जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५५ हजार ५९१ रुग्ण कोरोनामुक्त
– सद्यस्थितीत २७ हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १ लाख ५५ हजार ५९१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत २७ हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत २ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. जिल्हात सर्वाधिक रुग्णसंख्या नाशिक शहर व निफाड तालुक्यात आहे. तर सर्वात कमी रुग्णसंख्या पेठ तालुक्यात आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ५२७, चांदवड ८०५, सिन्नर ५४८, दिंडोरी ५३८, निफाड १ हजार ५९८, देवळा ८९८ , नांदगांव ५५८, येवला ४१७, त्र्यंबकेश्वर १७०, सुरगाणा १२८, पेठ ५४, कळवण ४१५, बागलाण ९९७, इगतपुरी ३६९, मालेगांव ग्रामीण ८०७ असे एकूण ८ हजार ८२९ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १६ हजार ५१२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७६९ तर जिल्ह्याबाहेरील १९८ असे एकूण २७ हजार ३०८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ३०६ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ८२.९५ टक्के, नाशिक शहरात ८४.८४ टक्के, मालेगाव मध्ये ७७.६३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.९१ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.९६ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ९८२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार १५२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २०३ व जिल्हा बाहेरील ७० अशा एकूण २ हजार ४०७ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
– १ लाख ८५ हजार ३०६ कोरोनाबाधित रुग्णांपैकी १ लाख ५५ हजार ५९१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले २७ हजार ३०८ पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.९६ टक्के
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)