देवगाव – निफाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुक अतिशय चुरशीची होऊन या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे नऊ उमेदवार भरघोस मतांनी निवडून येऊन देवगाव ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
या ग्रामपंचायतीची निवडणुक मोठया चुरशीची झाली. यात परिवर्तन व ग्रामविकास व आपला पॅनल तसेच या तिरंगी लढतीत परिवर्तन पॅनलने ९ जागा जिंकत सत्ता परिवर्तन केले. तर सत्ताधारी ग्रामविकास पॅनलचे ४ जागा जिंकल्या आहेत. तर आपला पॅनलला खातेही उघडता आले नाही. यात परिवर्तन व ग्रामविकास पॅनल समोरासमोर होते. तब्बल ३० वर्षानंतर सत्तांतर झाले. देवगाव ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची व बहुरंगी झाली.परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे : प्रभाग क्रं.१ दादासाहेब रामनाथ माळी (४८८), ईदुबाई सुभाष पिपंळे(५४२),मथुरा श्रीहरी बोचरे (५६१) प्रभाग क्रं.२ लहानु खंडेराव मेमाणे (४९१), कोमल भागवत गव्हाणे(४८१) प्रभाग क्रं.४ रामनाथ भिकाजी शिदे (३५३), किशोर दत्तु बोचरे(३५६), कमल शिवाजी बोचरे(४११) प्रभाग क्रं.५ वैशाली मच्छिंद्र अंढागळे(३३१) तर ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते पुढील प