पाच ग्रामपंचायतींना मिळणार नवीन कार्यालय
पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील विविध गावामध्ये विका कामांकरिता आमदार दिलीपराव बनकर यांच्या २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीच्या आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत सुमारे ३ कोटी ३३ लाखांच्या विकास कामांना प्रशाकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली
या विकास कामांमध्ये कोकणगाव येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), चाटोरी येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), तळवाडे येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), तामसवाडी येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), तारुखेडले येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), थेरगाव येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), रामनगर येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), वडाळी नजीक येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), सोनगाव येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), ओझर येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), म्हाळसाकोरे येथे सभामंडप बांधणे (रु.५ लक्ष), श्रीरामनगर येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष), खानगाव थडी येथे सभामंडप बांधणे (रु.१० लक्ष) पिंपळगाव निपाणी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे (रु.२० लक्ष), पाचोरे वणी येथे मारुती मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे (रु.१० लक्ष), साकोरे मिग येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे (रु.२० लक्ष), शिरसगाव येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे (रु.२० लक्ष), भेंडाळी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे (रु.२० लक्ष), मौजे सुकेणे येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे (रु.२० लक्ष), चांदोरी येथे चंद्रावती दूध डेअरी आवारात पेव्हर ब्लॉक बसविणे (रक्कम रु.१० लक्ष), दारणासांगवी येथील ग्रामपंचायत कार्यालय परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे (रक्कम रु.१० लक्ष), पिंपळगाव बसवंत येथील घोडके नगर येथे उद्यान निर्मिती करणे (रक्कम रु.२५ लक्ष), पिंपळगाव बसवंत येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर पोहच रस्त्यावर स्लॅब ड्रेन बांधणे (रक्कम रु.२५ लक्ष) तसेच संगणक खरेदी व कोरोना आजारावरील संसर्ग रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी रक्कम रु.२७.५० लक्ष याप्रमाणे एकूण रु.३ कोटी ३३ लाख रुपयांच्या कामांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये ५ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालय मिळणार आहे.