पिंपळगाव बसवंत – निफाड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती लढविणार असल्याचा निर्णय मनसेच्या ओझर येथील बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशान्वये, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, दिलीप दत्तू दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक विक्रम कदम, प्रकाश कोरडे, प्रमोद साखरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक ओझर येथे झाली. त्यावेळी निफाड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुका लढविण्याचे ठरले. आगामी होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. पक्ष निरीक्षकांनी बैठक घेऊन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी निरीक्षक म्हणून आलेले पक्षाचे नेते विक्रम कदम, बंटी कोरडे, प्रमोद साखरे यांनी तालुका पक्ष संघटन वाढण्यासाठी “गाव तेथे शाखा” व “घर तेथे मनसैनिक” ही संकल्पना मांडली. तसेच, तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश शेलार माजी तालुकाध्यक्ष प्रकाश गोसावी, विधानसभा अध्यक्ष शिवमूर्ती खडके, तालुका उपाध्यक्ष केशव वाघ, ओझर शहराध्यक्ष शामराव उगले, ओझर गट अध्यक्ष योगेश मोरे, पिंपळगाव शहराध्यक्ष राजू भवर, तालुका प्रवक्ते राजेश तापकिरे, पिंपळगाव बसवंत सरचिटणीस नीलेश सोनवणे, निफाड मनविसे तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, विधानसभा अध्यक्ष सुयोग गायकवाड, तालुका चिटणीस जयेश ढिकले, मनविसे पिंपळगाव शहराध्यक्ष गिरीश कसबे, ओझर शहर उपाध्यक्ष संदीप कर्पे, महिला आघाडी उपाध्यक्षा प्रतीक्षा नारद, प्रकाश शिवले, कैलास लभडे, विकास मराठे, गोरख मराठे, धनंजय साळुंखे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.