पिंपळगाव बसवंत: निफाड तालुक्यातील गावांना अतिवृष्टी व पूरहानी, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत, पायाभूत सुविधा पुरविणे व जनसुविधा योजनामार्फत .२ कोटी ३५ लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली.
अतिवृष्टी व पूरहानी मधून राज्यमार्ग क्र.२७ (बारागाव पिंप्री) पासून पाटापिंप्री तळवडे रामनगर सोनगाव गोंडेगाव रस्ता प्रजिमा १०८, कि.मी.१२/५०० ते १६/३०० (भाग सायखेडा, सोनगाव फाटा ते गोदानगर) व कि.मी.१९/२०० ते १९/९०० (भाग चांदोरी) ची मजबुतीकरण व डांबरीकरण व जलनिस्सारणाची काम मंजूर झाले असून सदर कामास रक्कम .१ कोटी ९० लाखाचे आहे.चांदोरी व सायखेडा भागातील रस्ते मजबुतीकरणाचे काम होणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/ पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे या योजने अंतर्गत पिंपळगाव बसवंत बेहेड रोड येथील अचानक नगर मधील मुस्लिम कब्रस्तान विकास कामे करण्यासाठी १० लाख, पालखेड येथे शादिखाना बांधकाम करण्यासाठी .१५ लाख तसेच जनसुविधा योजने अंतर्गत चितेगाव व जिव्हाळे येथे स्मशानभूमी अनुषंगिक कामे करणेकरीता प्रत्येकी रक्कम १० लाख निधी मंजूर झालेला आहे. निफाड तालुक्यासाठी अतिवृष्टी व पूरहानी, अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत/पायाभूत सुविधा पुरविणे व जनसुविधा अशा विविध योजनाच्या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, अन्न, नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निफाड तालुक्यातील नागरिकांच्या वतीने आमदार दिलीप बनकर यांनी आभार मानले.