नाशिक – निफाड तालुक्यातील कोरोना योद्ध्यांमार्फत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जाऊन मास्क आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना योद्ध्यांनी महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई येथे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सदर कोरोना योद्ध्यांनी कोरोनाला घाबरून न जाता, कोरोना पासून बचावासाठी, मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर बाळगा, याबद्दल जनजागृती केली. तसेच रविवारी १७ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आयोजित केलेली आहे. या दिवशी सर्वांनी आपल्या ० दिवस ते पाच वर्षापर्यंतच्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजावे, असे आवाहन केले. सध्याचे पल्स पोलिओ लसीकरण करण्याच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने लसीकरण सत्रांच्या ठिकाणी कोरोना बाबतची सर्व काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
आरोग्य विभाग, निफाड तालुका पंचायत समिती, निफाड यांच्या कोरोना योद्ध्यांच्या सदर पथकांमध्ये माजी तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे, तालुका नोडल अधिकारी डॉ. योगेश शिंदे, कसबे सुकेणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव पाटील, आरोग्यसेवक दिलीप बोदडे, प्रदीप पवार, गजानन जयतकर, गोरक्षनाथ गाढवे, कोंडीराम बनगर, सुरेश सोनवणे हे उपस्थित होते.