लासलगाव – निफाड तालुक्यातील येथील कोरोना वाढत्या रूग्णामुळे आज अचानक निफाडच्या प्रांत डाॅ अर्चना पठारे यांनी अचानक भेट देत दुकान सील केल्या. त्याचवेळी मोठी दंडात्मक कारवाई केली. आता त्यानंतर त्यांनी शुक्रवारी २६ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष बैठक आयोजित केली आहे.
ही बैठक निफाड पंचायत समितीचे सभागृहात होणार असून निफाड तालुक्यातील महत्वाची गावे असलेल्या ठिकाणी विविध व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष व बाजार समितीचे सचिव यांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव ,निफाड ,ओझर ,पिंपळगाव ,सायखेडा ,चांदोरीसह मोठ्या व ठिकठिकाणी असलेले व्यवसायीक संघटनेचे प्रतिनिधी न पाठवता स्वतः या या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.