नाशिक – जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव निफाड आणि सिन्नर तालुक्यात दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या १० दिवसात या दोन्ही तालुक्यात तब्बल ४ हजार ८११ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात निफाड मध्ये २६२८ तर सिन्नर तालुक्यात २१८३ नव्या बाधितांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात सोमवारी (३० नोव्हेंबर) ३६७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ५३८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मालेगाव शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
नाशिक शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १३७ झाली आहे. ९६ हजार ५५६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७९० जण उपचार घेत आहेत. सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २६२, ग्रामीण भागातील १०१ आणि जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६६ हजार ७१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६३८. पूर्णपणे बरे झालेले – ६४ हजार ३८१. एकूण मृत्यू – ९०४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ७९०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.४७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार २५४. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ३५७. एकूण मृत्यू – ६३७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २२४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३२६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०४२. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी