पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) – कपडे धुण्यासाठी व अंघोळ करण्यासाठी गेलेल्या कामगाराचा कादवा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) घडली. पाय घसरल्याने हा प्रकार घडला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, निफाड येथील निवृत्तीनगर परिसरात राहणारा रामजनम रामरतन गौतम (२१) हा मजुरी काम करणारा तरुण शुक्रवारी (दि. २३) रोजी सकाळी दहाच्या दरम्यान कादवा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी व अंघोळ करण्यासाठी गेला होता. यावेळी तो पाय घसरून नदीत पडला. त्याच्यासोबत असणाऱ्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण असफल ठरला. अखेर चांदोरी येथील पथक बोलावले व शोध घेतला पण शुक्रवारी रात्र झाल्याने शोधकार्य थांबविले. अखेर शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान पुन्हा शोध मोहीम हाती घेतल्यावर मृतदेह मिळून आला.मृत रामजनम गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, निफाड येथे तो मजुरी करायचा. निफाड उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. अधिक तपास हवालदार शिवाजी माळी करीत आहे.